राज्यात छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि सोलापूर या जिल्ह्यात तातडीनं कांदा बँक सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. काल कांदा महाबँक प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
कांदा हे नाशवंत पीक असून त्याची नासाडी रोखण्यासाठी अणुऊर्जेच्या साहाय्यानं त्यावर विकिरण प्रक्रिया करून कांद्याची साठवणूक करता येईल. या कांदा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा होणार असून अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातून या योजनेची सुरुवात होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिली.
हिंदुस्थान ॲग्रो या संस्थेच्या माध्यमातून या बँकेची स्थापना होत असून या बँकांच्या उभारणीसाठी औद्योगिक विकास महामंडळ, पणन विभाग, तसंच राज्य रस्ते विकास महामंडळाच्या उपलब्ध जागांचा वापर केला जाईल, अशा सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्या.