राज्यात ठिकठिकाणी गणेशोत्सव उत्साहाने साजरा होत आहे. सांगली जिल्ह्यातल्या ७९ गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवण्यात आली असून या गावांचा विशेष प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन गौरव करण्यात येईल. कोकणात गणेशोत्सवाचं भजन संस्कृतीशी अतूट नातं आहे. ही बाब लक्षात घेऊन गेल्यावर्षीपासून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने भजन साहित्याचं वाटप करण्यात येत आहे. यंदाही अनेक भजनी मंडळांना भजन साहित्याचं वाटप झालं.
तर, ठाणे जिल्ह्यात शासकीय योजनांच्या प्रसिद्धीसाठी विहंग गार्डन गणेशोत्सव सांस्कृतिक मंडळात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे बॅनर्स लावण्यात आले आहेत.