एक राज्य एक प्रादेशिक ग्रामीण बँक तत्वानुसार २६ प्रादेशिक बँकांच्या एकत्रिकरणाची अधिसूचना केंद्रीय वित्तीय सेवा विभागानं जारी केली आहे. त्यानुसार, राज्यात महाराष्ट्र प्रादेशिक ग्रामीण बँक, आणि विदर्भ प्रादेशिक ग्रामीण बँक यांचं विलिनीकरण केलं जाईल. या एकत्रित बँकेचं मुख्यालय छत्रपती संभाजीनगरमधे असेल.
प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या एकत्रीकरण प्रक्रियेचा हा चौथा टप्पा आहे. अर्थ मंत्रालयानं गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एकत्रीकरण योजना सुरू केली. सर्व संबंधितांशी चर्चा केल्यानंतर, १० राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून २६ प्रादेशिक ग्रामीण बँकांचं विलीनिकरण करण्यात आलं. सध्या, २६ राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिळून ४३ प्रादेशिक ग्रामीण बँका कार्यरत आहेत. एकत्रीकरणानंतर त्यांची संख्या २८ वर येईल. मात्र देशभरातल्या, ७०० जिल्ह्यांमध्ये मिळून त्यांच्या २२ हजारापेक्षा जास्त शाखा असतील.