डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

November 7, 2024 1:42 PM

printer

वन रँक वन पेन्शन योजनेला दहा वर्ष पूर्ण

वन रँक वन पेन्शन योजना एकाच श्रेणीत सेवानिवृत्त झालेल्या सर्व सैनिकांना समान निवृत्ती वेतन देणारी आहे. असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. सेवानिवृत्तीची तारीख गृहित न धरता हे निवृत्तीवेतन लागू केलं जात असल्याने त्याचा फायदा भारतीय सैन्यदलातून निवृत्त झालेल्या सैनिकांना मिळत असतो. वन रँक वन पेन्शन योजनेला दहा वर्ष पूर्ण झाली असून यासाठी चालू आर्थिक वर्षात ४ हजार ४६८ कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला आहे.

 

यावर्षी ३० सप्टेंबर त्यातील ८९५ कोटी रुपये सेवानिवृत्त सैनिकांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. वन रँक वन पेन्शन योजनेचा लाभ देशभरातील २५ लाख सेवानिवृत्त सैनिकांना झाला आहे. दर पाच वर्षांनी या योजनेचा आढावा घेण्यात येतो. नुकताच जुलै महिन्यात या योजनेचा आढावा घेण्यात आला होता.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे की, वन रँक वन पेन्शन योजना लागू करुन आता दहा वर्ष झाली असून देशातील सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीनं टाकलेलं पाऊल आहे. ही त्या सैनिकांना वाहिलेली श्रद्धांजलीही आहे ज्यांनी देशाचं रक्षण करतांना आपल्या प्राणाची आहुती दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा