देशभरातील विद्यापीठांत शिक्षण घेणाऱ्यांना जगभरातील प्रकाशकांनी प्रकाशित केलेलं साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशानं ‘एक देश एक सदस्यता’ योजनेची सुरुवात येत्या 1 जानेवारी पासून होणार आहे. केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार ए के सुद यांनी काल आकाशवाणीला ही माहिती दिली. 30 अग्रगण्य संशोधन प्रकाशक संस्थांकडील साहित्य उपलब्ध होणार आहे. या याजनेच्या पहिल्या टप्प्यात मुळे एकंदर 6 हजार 300 सरकारी शिक्षण संस्थांमधील 1 कोटी 77 हजारांहून अधिक विद्यार्थांना फायदा होईल. तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित, वैद्यकीय, व्यवस्थापन, सामाजिक विज्ञान आणि मानवता आदी विषयांवरील प्रबंध अभ्यासासाठी उपलब्ध होतील
Site Admin | December 11, 2024 9:59 AM | One Nation One Subscription