डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ योजनेला प्रारंभ

विद्यार्थ्यांना विद्वत्तायुक्त संशोधन लेख आणि पत्रिका प्रकाशनांमधलं ज्ञान सहज उपलब्ध व्हावं या उद्देशानं आखण्यात आलेल्या ‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ योजनेला आजपासून प्रारंभ झाला. यामुळे सरकारी अनुदान असलेल्या शैक्षणिक संस्था, विद्यापीठं आणि भारतीय तंत्रज्ञान संस्थेतल्या देशभरातल्या सुमारे १ कोटी ८० लाख विद्यार्थ्यांना जगभरातल्या उच्च दर्जाच्या नियतकालिकांमध्ये उपलब्ध असलेल्या ज्ञानाचं भांडार खुलं होईल. यामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय, गणित, व्यवस्थापन, सामाजिक शास्त्र आणि मानवता या विषयांमधल्या १३ हजार ४०० आंतरराष्ट्रीय पत्रिका उपलब्ध असतील. या योजनेच्या पुढच्या टप्प्यात ही सुविधा खाजगी शैक्षणिक संस्था आणि त्यानंतर सर्वांसाठीच सुरु केली जाईल असं देशाचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा