राज्यघटनेवर आजही सभागृहात चर्चा होणार आहे. भारतीय जनता पार्टीनं आपल्या खासदारांना पक्षादेश जारी केला आहे. एक देश एक निवडणूक यासंबंधातील दोन विधेयकं आज लोकसभेत चर्चेसाठी पटलावर ठेवण्यात येणार आहेत. भाजपानं आपल्या खासदारांनी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हिप जारी केला आहे. केंद्रिय कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल 129 व्या घटना दरुस्ती विधेयक सादर करतील. एक देश एक निवडणूक या विषयावर विचार करण्यासाठी केंद्र सरकारनं उच्च स्तरीय समितीची स्थापना केली होती. या समितीच्या सूचनांना स्वीकृती दिल्यानंतर हा प्रस्ताव सादर केला जात आहे.
Site Admin | December 17, 2024 9:55 AM | Loksabha | One Election" | One Nation