डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

नवी दिल्लीत ‘एक राष्ट्र – एक निवडणूक’ या संबंधित दोन विधेयकांवर चर्चा करण्यासाठी पहिली बैठक

‘वन नेशन – वन इलेक्शन’ अर्थात ‘एक राष्ट्र – एक निवडणूक’ या संबंधित दोन विधेयकांवर चर्चा करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची आज नवी दिल्ली इथं पहिली बैठक झाली. या दोन विधेयकांना एकशे एकोणतीसावं  संविधान सुधारणा विधेयक २०२४, आणि केंद्रशासित प्रदेश कायदा सुधारणा विधेयक २०२४, असं नाव दिलं आहे. या समितीमध्ये लोकसभेचे २७ आणि राज्यसभेचे १२ असे एकूण ३९ सदस्य आहेत. संसदेच्या पुढच्या अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी ही समिती आपला अहवाल सादर करेल. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा