‘एक देश एक निवडणूक’ संदर्भातल्या दोन विधेयकांवर विचारविनिमय करण्यासाठी ३१ सदस्यांची संयुक्त संसदीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीत लोकसभेतले २१ आणि राज्यसभेतले दहा खासदार आहेत. भाजप नेते पी पी चौधरी, अनुराग सिंग ठाकूर, पुरुषोत्तम रुपाला यांच्यासह काँग्रेस नेते प्रियांका गांधी, मनिष तिवारी, तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांचा या समितीमध्ये समावेश आहे.
Site Admin | December 19, 2024 1:51 PM | One Nation One Election