मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे दरवर्षी १० लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार असून कुशल आणि रोजगारक्षम महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या योजनेची मदत होईल, असं कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी म्हटलं आहे. सह्याद्री अतिथीगृहात ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी’ आयोजित ‘उद्योजकांशी संवाद’ या बैठकीत मंगल प्रभात लोढा बोलत होते.
राज्यातल्या ४० उद्योजक आणि २० उद्योग क्षेत्रातल्या विविध संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.