राज्यभरात प्रत्येक पाचशे मतदारांमागे कार्यकारी अधिकारी याप्रमाणे एक लाख ९४ हजार विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त केले जाणार असल्याची माहिती, राज्य निवड समितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती संदर्भातला सुधारित शासन निर्णय काल जारी करण्यात आला. प्रत्येक ठिकाणी ३३ टक्के महिलांची नियुक्ती केली जाणार असून, या पदावरील व्यक्तीचा कालावधी पाच वर्षांचा असेल, तसंच ग्रामसभेत या अधिकाऱ्यांना विशेष निमंत्रित केलं जाईल, असं या शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे.
Site Admin | February 4, 2025 10:11 AM | चंद्रशेखर बावनकुळे | मतदार | महसूल मंत्री | विशेष कार्यकारी अधिकारी
राज्यात एक लाख ९४ हजार विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त केले जाणार
