कटक इथं सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारतापुढं विजयासाठी ३०५ धावांचं आव्हान ठेवलं आहे.
इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. सामन्यातला शेवटचा चेंडू बाकी असताना त्यांचा डाव संपला. मात्र त्यांनी ३०४ धावा केल्या. फिल्सोल्ट आणि बेेन डकेट यांनी पहिल्या गड्यासाठी ८१ धावांची भागीदारी केली.
ज्यो रुटनं ६९, तर बेेन डकेटनं ६५, धावा केल्या. लियाम लिविंगस्टोननं ४१, तर हॅरी ग्रोथनं ३१ धावांचं योगदान दिलं. भारतातर्फे रविंद्र जडेजानं ३ गडी बाद केले.