पंचविसाव्या कारगील विजय दिना निमित्त, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या कारगील युद्ध स्मारकाला भेट देणार आहेत. आपलं कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांना ते श्रद्धांजली अर्पण करतील. यावेळी ते दूरस्थ पद्धतीनं शिंकुन-ला बोगदा प्रकल्पाचा पहिला सुरुंग स्फोटही करतील. निमू-पदुम-दारचा मार्गावर सुमारे पंधरा हजार ८०० फूट उंचीवर हा दुपदरी बोगदा बांधला जाणार असून, लेह या भागाशी कोणत्याही ऋतूत संपर्क साधण्यासाठी तो उपयोगी ठरेल. शिंकुन-ला, हा जगातला सर्वात जास्त उंचीवरचा बोगदा असेल. आपल्या सशस्त्र दलांच्या आणि उपकरणांच्या जलद हालचालीसाठी तो उपयोगी ठरणार असून, लडाखच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना देईल.
Site Admin | July 25, 2024 2:59 PM | कारगील विजय दिन | नरेंद्र मोदी