आज नौदल दिवस आहे. देशाच्या सुरक्षेत नौदलाची भुमिका महत्वाची आहे. नौदलाच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 1971 मध्ये ट्रायडंट अभियानादरम्यान पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत चार पाणबुड्याना समुद्रात बुडवण्यात भारतीय नौदलाला यश आलं होतं यामध्ये शेकडो पाकिस्तानी नौदलाचे कर्मचारी मारले गेले होते. या विजयाची आठवण म्हणून नौदल दिवस साजरा केला जातो. यानिमित्त पुरी इथं ब्लू फ्लॅग बीचवर होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रपती दौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसंच राष्ट्रपती आज सकाळी पुरीतील श्री जगन्नाथ मंदिराला भेट देतील आणि गोपबंधू आयुर्वेद महाविद्यालयाच्या 75 व्या वर्धापन दिन सोहळ्यातही सहभागी होतील.