डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशभरात सर्वत्र आज विविध उपक्रमांचं आयोजन

देशभरात आज दहावा राष्ट्रीय हातमाग दिन साजरा केला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. हातमागाच्या समृद्ध परंपरेचा आपल्याला अभिमान असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे.

 

हातमाग दिनानिमित्त नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं आज विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते हातमाग क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी विणकरांना संत कबीर पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान उपराष्ट्रपतींच्या हस्ते पुस्तक प्रकाशनही होणार आहे. उत्सवाचा एक भाग म्हणून देशभरात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

 

हातमाग क्षेत्राचं महत्त्व आणि देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात या
क्षेत्राचं योगदान याबद्दल जागरूकता निर्माण करणं हा हातमाग दिन साजरा
करण्याचा उद्देश आहे. त्यानिमित्तानं आपल्या कलाकुसरीतून देखणी वस्त्रनिर्मिती करणाऱ्या हातमाग विणकरांचा सन्मान करणं आणि हातमाग उद्योगामध्ये कार्यरत व्यक्तींमध्ये अभिमानाची भावना निर्माण करत त्यांना प्रेरणा देणं या व्यापक उद्देशानं हा दिवस आयोजित केला जातो.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा