राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त राज्यात एक ते 19 वर्षे वयोगटातील मुलामुलींना जंतनाशक गोळ्या देण्याची मोहीम सुरु करण्यात आली असून, दहा डिसेंबरपर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यातील 10 तालुक्यांमधील 1 लाख 72 हजार मुलांना काल ठिकठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीनं जंतनाशक गोळी देण्यात आली. या मोहिमेपासून वंचित राहिलेल्या बालकांना 10 डिसेंबरला ही गोळी देण्यात येणार असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रताप शिंदे यांनी सांगितलं.
Site Admin | December 5, 2024 10:03 AM | मोहीम | राष्ट्रीय जंतनाशक दिन
राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त राज्यात एक ते 19 वर्षे वयोगटातील मुलामुलींना जंतनाशक गोळ्या देण्याची मोहीम सुरु
