डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त देशोदेशी कार्यक्रम होत आहेत. बांगलादेशात भारतीय राजदूतावासानं ढाका येथील मिरपूर इनडोअर स्टेडिअममध्ये उद्या योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं असून या कार्यक्रमात बांगलादेशची योग संघटना सहभागी होणार आहे. बांगलादेशातले भारतीय राजदूत प्रणय वर्मा सर्वांचं स्वागत करणार आहेत.

 

नेपाळमधल्या भारतीय दूतावासानं काल पोखरा इथं फेवा तलावाच्या काठी योग प्रात्यक्षिकांचं आयोजन केलं होतं. त्यात स्थानिक रहिवासी, स्थानिक प्रशासन यंत्रणांचे अधिकारी, भारतीय लष्करातील निवृत्त गोरखा जवान, तसंच दूतावासातले कर्मचारी  मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

 

उद्याच्या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतल्या भारतीय दूतावासानंही वॉशिंग्टन इथं योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. 

 

नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीनं उद्या सकाळी साडेसहा वाजता श्री गुरुग्रंथ साहिबजी भवन एनआरआयच्या बाजुला असलेल्या हिंगोली गेट इथं योगदिनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी नांदेड जिल्हयातल्या विविध योग समित्या, योग प्रशिक्षक आणि आयुष मंत्रालयाचे प्रतिनिधी यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.

 

नागपूरच्या केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद (सीसीआरएएस), आयुष मंत्रालय आणि भारत सरकार अंतर्गत नागपूरच्या प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्थेतर्फेही उद्या आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सामाईक योग प्रोटोकॉल म्हणून ओळखले जाणारे ४५ मिनिटांचे योग प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे. मुंबईत उद्या २४ विभागांमध्ये १०० प्रशिक्षण सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा