आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रात पंढरपूर इथं वारकऱ्यांची अलोट गर्दी झाली आहे. श्री विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय महापूजा सपत्नीक केली. राज्यात भरपूर पाऊस-पाणी होऊ दे, माझा शेतकरी सुखी-समाधानी राहू दे अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलचरणी केली. मानाचा वारकरी प्रतिनिधी म्हणून नाशिक जिल्ह्यातील बाळू अहिरे आणि त्यांच्या पत्नी आशा यांना मान मिळाला. आषाढी यात्रेदरम्यान वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी केलेल्या उपाययोजनांची मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती दिली.
दर्शनासाठी व्हीआयपी पेक्षा सर्वसामान्यांना प्राधान्य मिळावं असा आपला आग्रह असल्याचं त्यांनी सांगितलं. पंढरपूरच्या मंदिराचा विकास आराखडा स्थानिकांना विश्वासात घेऊन तयार करत असल्याचं ते म्हणाले.उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तसंच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, यावेळी उपस्थित होते.
यावेळी मानाच्या पालख्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलंआषाढी यात्रेचा मुख्य सोहळा आज मोठ्या उत्साहात पूर्ण होत आहे. या कार्यक्रमासाठी जवळपास १५ लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले आहेत.राज्यात इतरत्रही विठ्ठलमंदिरांमधे दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या आहेत. मुंबईत वडाळा इथल्या विठ्ठलमंदिरात भाविकांची गर्दी पहायला मिळत आहे.
राज्यात इतरत्रही विठ्ठलमंदिरांमधे दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या आहेत. मुंबईत वडाळा इथल्या विठ्ठलमंदिरात भाविकांची गर्दी पहायला मिळत आहे.