पुण्यात साजऱ्या होणाऱ्या ७७व्या लष्कर दिनानिमित्त आज बॉम्बे इंजिनियरिंग ग्रुपच्या मैदानावर भव्य संचलन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी होणाऱ्या गौरवगाथा या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उपस्थित असतील. या कार्यक्रमात लष्कर पोलीस दल तसंच महाराष्ट्र एनसीसीचं महिला पथक सहभागी होईल. तसंच, भारतीय लष्करात वापरली जाणाऱ्या शस्त्रास्त्रं तसंच उपकरणांचा समावेशही संचलनात होईल. या कार्यक्रमात प्रथमच नेपाळच्या लष्करी वाद्यवृंदही सहभागी होईल.
Site Admin | January 15, 2025 10:34 AM | 77th Army Day | संचलन सोहळा