अमेरिकेतून भारतीय नागरिकांना हद्दपार केल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी गदारोळ केल्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचं कामकाज आधी दुपारी बारा आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.
लोकसभेचं कामकाज आज सकाळी सुरू होताच काँग्रेस, समाजवादी पक्षासह इतर विरोधी पक्षांनी अमेरिकेतूून भारतीय नागरिकांच्या हद्दपारीच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केली, तसंच घोषणाबाजी केली. याआधी काँग्रेसने या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव मांडला. यावर हे प्रकरण परकीय राष्ट्राशी संबंधित असल्यामुळे सभागृह सुरळित चालू द्यावी असं आवाहन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी विरोधकांना केलं. त्यानंतरही विरोधकांची घोषणाबाजी सुरू राहिली. त्यामुळे सभापतींनी सभागृहाचं कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब केलं होतं. त्यानंतर सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांची घोषणाबाजी सुरू राहिल्यामुळे सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं.
राज्यसभेतही याच मुद्द्यावर विरोधकांनी चर्चेची मागणी केली. विरोधकांच्या घोषणाबाजीनंतर राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी सभागृहाचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब केलं होतं. त्यानंतर सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर परराष्ट्र व्यवहार मंत्री आज दुपारी दोन वाजता या मुद्द्यावर स्पष्टीकरण देतील असं राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सांगितलं. त्यानंतर सभागृहात प्रश्नोत्तराचा तास सुरु झाला.
Site Admin | February 6, 2025 4:16 PM | अमेरिका | भारतीय नागरिक | संसद | सभागृहात गदारोळ
अमेरिकेतून भारतीय नागरिकांना हद्दपार केल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांचा संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ
