डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वत्र आदरांजली

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांना सर्वत्र आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह इतर मान्यवरांनी सावित्रीबाईंच्या योगदानाचं स्मरण केलं आहे.

 

सावित्रीबाई फुले या स्त्री सक्षमीकरणाच्या जनक होत्या. शैक्षणिक, सामाजिक सुधारणा क्षेत्रातल्या त्या प्रणेत्या होत्या, असे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात काढले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतल्या त्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशात स्त्रीशिक्षणासाठी, प्लेगपीडितांसाठी सावित्रीबाईंनी केलेल्या कार्याचं स्मरण केलं आहे आणि सर्व महिलांना महिला शिक्षण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही समाजमाध्यमावरच्या संदेशात सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहिली आहे.

 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचं स्मरण केलं आहे. सावित्रीबाईंनी महिला शिक्षणाचे दरवाजे उघडले, तसंच समाजातल्या वंचित, पीडित आणि शोषित घटकांच्या हक्कांसाठी जोरदार लढा दिला, असं खरगे यांनी म्हटलं आहे.

 

नाशिकमध्ये मुंबई नाका इथं उभारण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याला माजी मंत्री आणि समता परिषदेचे नेते छगन भुजबळ यांनी अभिवादन केलं.

 

राज्याचे राजशिष्टाचार आणि पणनमंत्री जयकुमार रावल यांनीही सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहिली. नंदुरबारमधल्या माळीवाड्यातल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी धुळे शहरातील महाजन हायस्कूलच्या विध्यार्थ्यांनी वाजत गाजत शोभायात्रा काढली. विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जयजयकाराच्या घोषणा देत लेझीम नृत्य सादर केले. पुष्पहार अर्पण करुन त्यांनी अभिवादन केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा