अमेरिकेत काल नववर्षाच्या पहिल्याच दिवशी न्यू ऑरलियन्स इथल्या फ्रेंच क्वार्टर मध्ये एक व्यक्तीने गर्दीत ट्रक घुसवून केलेल्या हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू झाला तर ३५ जण जखमी झाले. ट्रक घुसवणारा माथेफिरू तरुण ४२ वर्षाचा असून शमसुद्दींन बहार जब्बार अस त्याच नाव आहे आणि तो पोलिसांच्या गोळीबारात मारला गेला. त्याच्या कडून एक रायफल जप्त करण्यात आली असून ट्रक वर लावलेले काळे झेंडे कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत का याचा पोलिस तपास करत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी या घटनेचा निषेध केला असून, मृतांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त केली आहे तसच जखमींना सरकारतर्फे सर्व मदत द्यायच आश्वासन दिल आहे.
Site Admin | January 2, 2025 2:32 PM | America | French Quarter | international news | New Orleans'
अमेरिकेत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी न्यू ऑरलियन्स इथल्या फ्रेंच क्वार्टर मध्ये एक व्यक्तीने गर्दीत ट्रक घुसवून केलेल्या हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू झाला तर ३५ जण जखमी
