दुधाला प्रतिलीटर ४० रुपये भाव तसंच रास्त आणि किफायतशीर दर- एफआरपी देण्याच्या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं राज्यभरात आजपासून २१ जुलैपर्यंत तीव्र आंदोलनं करण्यात येणार आहे. शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक अजित नवले यांनी ही माहिती दिली.
या आंदोलनाचा भाग म्हणून अहमदनगर जिल्ह्यात कोतुळ इथले शेतकरी गेले दहा दिवस धरणं आंदोलन करत आहेत. आंदोलनाच्या आजच्या दहाव्या दिवशी कोतुळ बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. मध्यवर्ती चौकात बांधलेली दुधाची हंडी अभंग आणि भजनाच्या निनादात शेतकरी कार्यकर्त्यांनी फोडली. यावेळी सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला.