दहशतवाद आणि त्याचं मूळ यांचा बिमोड करण्यासाठीच्या निर्णायक लढाईला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. तथापि पहलगाम दहशतवादी हल्ल्यात निरपराध लोकांचा बळी गेल्याबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्यांना परकेपणा वाटेल अशा कोणत्याही स्वरुपाची अस्थानी कारवाई होऊ नये अशी चिंताही त्यांनी वक्तव्य केली आहे.
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांची यंत्रणा उखडून टाकण्यासाठी सक्रिय दहशतवादी आणि त्यांच्या भूमीगत कार्यकर्त्यांच्या घरांवर धडक कारवाई करत नऊ घरं पाडून टाकण्यात आली असताना तसंच शेकडो लोकांची चौकशी सुरू असताना उमर यांनी हे वक्तव्य केलं आहे.