लोकसभेच्या सभापतीपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं ओम बिर्ला यांना पुन्हा संधी दिली आहे. आज त्यांनी सभापतीपदासाठी अर्ज भरला. विरोधकांकडून काँग्रेस खासदार के. सुरेश यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. या पदासाठी उद्या निवडणूक होणार आहे.
लोकसभेच्या सभापतींची निवड एकमतानं आणि बिनविरोध व्हायला हवी असं संसदीय कार्य मंत्री किरेन रिजीजू यांनी म्हटलं आहे. सरकारनं विरोधकांशी चर्चा करुन सहमतीचा प्रयत्न केला. पण विरोधकांनी उप सभापतीपदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर करण्याची मागणी केली. ते योग्य वेळी जाहीर करू असं सत्ताधारी पक्षानं सांगितलं. सहमती ही अटींशिवाय व्हायला हवी, असं रिजीजू म्हणाले.