विधीमंडळाद्वारे देशातल्या नागरिकांची सेवा करण्याची महत्त्वाची जबाबदारी पीठासीन अधिकाऱ्यांवर आहे, असं प्रतिपादन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी केलं. पाटण्यात सुरू झालेल्या ८५ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते आज बोलत होते. विधीमंडळात होणारे गोंधळ आणि त्यांचं पावित्र्य जपा. संविधानानं घालून दिलेल्या मूल्यांच्या आधारे नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
संविधानाच्या अंमलबजावणीला ७५ वर्ष होत असताना संसद आणि राज्य विधीमंडळांचं संविधानाच्या बळकटीतलं योगदान यावर या संमेलनात विशेष चर्चा होणार आहे.