ओडिशामधे भुवनेश्वरमधल्या एका खाजगी विद्यापीठात नेपाळी विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी ओडिशा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या संदर्भात विद्यापीठातल्या एका विद्यार्थ्याला अटक केली आहे. नेपाळचे प्रधानमंत्री केपी शर्मा ओली यांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ओडिशातील घटनेमुळे घाबरलेल्या नेपाळी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी नवी दिल्लीतल्या नेपाळी दूतावासानं दोन अधिकाऱ्यांना पाठवलं आहे, असं त्यांनी आपल्या समाज माध्यमांवर म्हटलंय. दरम्यान, विद्यार्थी संघटनांनी मृत विद्यार्थ्याला न्याय देण्याची मागणी केली आहे.
Site Admin | February 18, 2025 1:33 PM | Odisha Police
ओडिशामध्ये नेपाळी विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल
