ओदिशात आजपासून सार्वत्रिक आरोग्यसेवा पुरवण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल म्हणून आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनधन आरोग्य योजना सुरू होत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा कटक इथं एका विशेष कार्यक्रमात या एकात्मिक आरोग्य विमा योजनेचा प्रारंभ करतील. ओदिशा सरकारच्या गोपबंधू जन आरोग्य योजना आणि आयुष्मान वयो वंदन योजनांचाही आयुष्मान भारत योजनेत समावेश केला जाणार आहे