डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

October 23, 2024 2:14 PM

printer

‘दाना’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशा प्रशासन सज्ज

‘दाना’ चक्रीवादळ ताशी ३ किलोमीटर वेगानं ओडिशाच्या किनाऱ्याकडे सरकत आहे. हे चक्रीवादळ उद्या रात्री उशिरा किंवा शुक्रवारी पहाटे भद्रक जिल्ह्यात धामरा बंदराजवळ, केंद्रपाडा आणि बालासोर जिल्ह्याच्या किनाऱ्याच्या दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ धडकताना ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे.

 

ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी चक्रीवादळादरम्यान आणि नंतर करावयाच्या मदत आणि बचाव कार्यावर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बाधित भागातून स्थलांतर सुरू असून प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकं सतर्क आहेत. पूर्व किनारपट्टी रेल्वेनं १९८ गाड्या रद्द केल्या असून किनारपट्टीवरील सर्व शाळा, महाविद्यालयं आणि विद्यापीठं तीन दिवस बंद राहणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा