ओदिशातल्या सुंदरगढ जिल्ह्यातल्या गायकानापल्ली गावाजवळ पहाटेच्या सुमारास एमसीएल-टपोरिया मार्गावर ट्रेलर ट्रक आणि व्हॅन मध्ये झालेल्या अपघातात पाच जण ठार तर सात जण गंभीर जखमी झाले. या अपघातात पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला असून जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. दाट धुक्यामुळं दृश्यमानता कमी झाल्यानं हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.
Site Admin | November 2, 2024 8:26 PM | Accident
ओदिशात झालेल्या अपघातात पाच जण ठार तर सात जण गंभीर जखमी
