केंद्र सरकारनं ओडिशाला 73 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे विकास प्रकल्प दिले असल्याचं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं, ते काल नवी दिल्ली इथं ओडिशा दिनानिमित्त आयोजित समारंभात बोलत होते.
1 एप्रिल 1936 ला ओडिशा हे स्वतंत्र राज्य म्हणून घोषित करण्यात आलं त्यानिमित्त ओडीशा दिवस साजरा केला जातो. या कार्यक्रमाला ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांजी, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुयाल ओराम ही यावेळी उपस्थित होते.