समाज माध्यमावर प्रसारित होणारा अश्लील मजकूर रोखण्यासाठी सध्याचे कायदे आणखी मजबूत करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं आहे. लोकसभेत आज पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना वैष्णव म्हणाले की, समाज माध्यम हे आजघडीला वृत्तपत्रीय स्वातंत्र्याचं मोठं माध्यम असलं तरी त्यावरच्या आशयाचं संपादन होत नसल्यामुळे अनेक प्रकारचे अश्लील मजकूर देखील प्रकाशित केले जातात. ओटीटी माध्यमावरच्या आशयाविषयीही बोलताना वैष्णव म्हणाले की, आपल्या देशाची संस्कृती आणि समाजमाध्यमांचा उगम ज्या देशातून झाला आहे, तिथली संस्कृती यात फरक आहे. त्यामुळे संसदेच्या स्थायी समितीने हा मुद्दा उचलून धरावा आणि त्यासाठी कठोर कायदे करावेत.
Site Admin | November 27, 2024 6:10 PM | ashvini vaishnav