इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या एन व्ही एस – झीरो टू या उपग्रहाला नियोजित कक्षेत जाण्यात अपयश आलं आहे. उपग्रहाला नियोजित कक्षेत स्थापित करणाऱ्या थ्रस्टरच्या झडपा वेळेवर उघडल्या नाहीत, असं इसरोतर्फे सांगण्यात आलं. संबंधित तांत्रिक अडथळा दूर करण्याच्या दृष्टीनं पर्यायी व्यवस्थेचा वापर केला जात आहे, असंही इसरोनं म्हटलं आहे. हसन इथली मुख्य नियंत्रण यंत्रणा परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे, उपग्रहाच्या इतर सर्व यंत्रणा तंदुरुस्त आहेत, सध्या उपग्रह लंबगोल कक्षेत असून त्यावरची सौर पॅनेल्स कार्यान्वित झाली आहेत, इत्यादी माहिती यात नमूद केली आहे.
Site Admin | February 3, 2025 2:34 PM | ISRO | NVS-Zero Two satellite
एन व्ही एस – झीरो टू या उपग्रहाला कक्षा वाढवताना तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागला: इस्रो
