डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 11, 2024 6:04 PM | Palghar

printer

पालघरमध्ये ग्रामीण भागात आदिवासी कुटुंबासाठी पोषण अभियान उपयुक्त

पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात राहणाऱ्या आदिवासी समुदायातील कुटुंबासाठी पोषण अभियान उपयुक्त ठरत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. किमान या अभियानाच्या माध्यमातून का होईना पण ग्रामीण आणि शहरी भागातल्या माता आणि बालकं आता पोषक आहार घेऊ लागले आहेत. 

वळणपाडा अंगणवाडीच्या माध्यमातून या भागातल्या बालकांना ताजा पोषण आहार मिळत आहे. तसचं गर्भवती मातांना देखील टीएचआरच्या माध्यमातून पौष्टिक आहार पुरवला जात आहे. गर्भवती मातांनी कशा प्रकारचा आहार घ्यावा, याबाबतची सर्व माहिती गर्भवती मातांना तिथल्या अंगणवाडी कार्यकर्त्या समजावून सांगतात. त्यामुळे त्याचा फायदा होत असल्याचं इथल्या लाभार्थी माता सांगतात. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा