एनटीएफ अर्थात राष्ट्रीय कृती दलाची दुसरी बैठक आज दूरदृष्यप्रणालीमार्फत होत आहे. या बैठकीचं अध्यक्षस्थान केंद्रीय गृह सचिव आणि केंद्रीय आरोग्य सचिव संयुक्तपणे भूषवणार असून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक बैठकीत सहभागी होतील. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंबंधी तात्काळ करण्याच्या उपाययोजनांविषयी चर्चा होणार आहे. राष्ट्रीय कृती दलाची पहिली बैठक काल कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झाली. या बैठकीत विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली असून कृती दलाच्या सदस्यांनी आपली मतं मांडली. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्या संदर्भात तीनशे ते चारशे सूचना मिळाल्याचं कृती दलाच्या सदस्यांनी सांगितलं. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ‘Suggestions to NTF’ नावाचं पोर्टल तयार केलं असून त्यावर सूचना मागवल्या आहेत.
Site Admin | August 28, 2024 1:41 PM | NTF