राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यांनी आज बीजिंग इथं प्रमुख द्वीपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करणं तसंच पूर्व लडाखमधल्या लष्करी पेचामुळे गेल्या चार वर्षांपासून बिघडलेले परस्पर संबंध कसे सुधारता येतील यावर बैठकीत चर्चा झाली. तेविसाव्या विशेष प्रतिनिधी संवादासाठी काल दोवाल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय शिष्टमंडळ चीन दौऱ्यावर गेलं आहे.
Site Admin | December 18, 2024 5:23 PM | India-china | NSA Ajit Doval