राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जेक सुलीवान यांच्यादरम्यान आज नवी दिल्ली इथं बैठक होणार आहे. सध्या आव्हान असलेले मुद्दे आणि नव्या तंत्रज्ञान अर्थात iCETतसंच दोनही देशांदरम्यानच्या इतर द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध व्यापक आहेत, सध्याच्या अमेरिकन प्रशासनचा कार्यकाळ संपत असला तरी, या काळातही द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत आणि अशा भेटींमधून दोनही देशांदरम्यानच्या चांगल्या संबंधांची ताकद दिसून येते. असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयवाल यांनी या भेटीबद्दल बोलताना गेल्या आठवड्यात प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं.
Site Admin | January 6, 2025 9:19 AM | NSA Ajit Doval | US counterpart Jake Sullivan