भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असून अमेरिकी डॉलर वगळता इतर परदेशी चलनांच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण होत नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. २०२५-२६ या वर्षाचा अर्थसंकल्प काल संसदेत सादर झाल्याच्या पार्श्वभूमीवर वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. देशातल्या प्रामाणिक करदात्यांमुळे अर्थव्यवस्थेला मोलाचं योगदान मिळत असून यंदाचा अर्थसंकल्प तयार करताना त्यांच्याकरता करांमधे सवलत द्यायचं उद्दिष्ट होतं, असं त्या म्हणाल्या. करआकारणी सुलभ आणि सोपी असावी, त्यामुळे करभरणा प्रामाणिकपणे करण्याला प्रोत्साहन मिळतं, असं त्यांनी सांगितलं.
Site Admin | February 2, 2025 8:13 PM | Finance Minister Nirmala Sitharaman | FM Nirmala Sitharaman
भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असून अमेरिकी डॉलर वगळता इतर चलनांच्या तुलनेत रुपया घसरत नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून स्पष्ट
