झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना आज जारी झाली. २५ ऑक्टोबरपर्यंत यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. २८ तारखेला अर्जांची छाननी होईल आणि ३० ऑक्टोबर ही अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात ४३ मतदारसंघांमधे १३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. राज्यात सर्वच राजकीय आघाड्यांमध्ये जागावाटपाबाबतच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. राज्यात भाजपा, एजेएसयू, संयुक्त जनता दल आणि चिराग पासवान यांच्या एलजीपी पक्षांनी आघाडी केली असून झारखंड मुक्ती मोर्चा काँग्रेस,राष्ट्रीय जनता दल आणि मार्क्सवादी पक्षासोबत निवडणूक लढवणार आहे.दरम्यान राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं जागावाटप जाहीर झालं असून भाजपा -६८- जागा लढवणार आहे.
Site Admin | October 18, 2024 3:54 PM | Assembly Elections | Jharkhand | Notification