डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना जारी

जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज निवडणूक आयोगानं आज अधिसूचना  जारी केली. पहिल्या टप्प्यात १८ सप्टेंबरला  मतदान होणार असून त्यात पुलवामा, अनंतनाग, शोपियां, कुलगाम, रामबन, किश्तवाडा आणि डोडा जिल्ह्यांतील २४ विधानसभेच्या जागांचा समावेश आहे. निवडणूक आयोगानं पम्पोर,त्राल,पुलवामा, राजपुरा, जैनापुरा, शोपिया,डी.एच. पोरा, कुलगाम, देवसर, दुरू,कोकेरनाग, अनंतनाग पश्चिम, अनंतनाग, श्री गुफवाडा जीज बेहरा, शांगस-अनंतनाग पूर्व, पहलगाम, इंदरवाल, किश्तवाड, पद्दर-नागसेनी, भदरवाह, डोडा,डोडा-पूर्व, रामबन आणि बनिहाल इथल्या विधानसभेच्या जागांसाठीही अधिसूनचा जारी केली आहे. या जागांसाठी २७ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. २८ ऑगस्टला अर्जांची छाननी केली जाईल. अर्ज मागं घेण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट आहे. विधानसभेच्यासाठी मतदारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता असून मतदारांची संख्या किमान ९० लाखांच्या आसपास असेल. जम्मू आणि काश्मीरमध्ये एकूण ८७ लाख ९ हजार मतदार असून त्यात ४४ लाख ४६ हजार पुरुष तर ४२ लाख ६२ हजार महिला आहेत. २० लाख ७ हजार युवा मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जम्मू काश्मिरमध्ये ९० विधानसभेच्या जागा असून त्यात ७४ खुल्या वर्गासाठी, ७ अनुसुचित जाती आणि ९ अनुसुचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा