डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

बदलापूरमधल्या लैैंगिक अत्याचार प्रकरणी राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

बदलापूरमधल्या शाळेत लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची स्वतःहून दखल घेत मुंबई उच्‍च न्‍यायालयानं आज सुनावणी घेतली. या प्रकरणी पोलिसांनी त्यांची भूमिका बजावली नसल्याचं सांगत न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली. लैंगिक अत्याचार झाला आहे याची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्‍हा दाखल करायला हवा होता, मात्र बदलापूरमधल्या जनक्षोभानंतरच पोलिसांनी कारवाई केली, असं न्यायालयानं म्हटलं आहे. 

मोठा जनक्षोभ उसळल्याशिवाय यंत्रणा काम करत नाही, ही आता सामान्य बाब झाली आहे. लोकांना रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याची वेळ येऊ नये. लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांबाबत पोलीस दल संवेदनशील बनवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, असं न्यायालयानं सांगितलं. 

याप्रकरणी संबंधित शाळेनं कोणतीही कारवाई केली नाही, पोलिसांनाही कळवलं नाही. त्याबद्दल शाळेवर कारवाई केली पाहिजे.

याप्रकरणी सरकारनं काय पावलं उचलली आहेत, आणि शाळांमधे मुलामुलींच्या सुरक्षेसाठी काय पावलं उचलणार आहात, याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा, असे निर्देश न्यायालयानं महाअधिवक्त्यांना दिले. पुढची सुनावणी २७ ऑगस्‍टला होणार आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा