उत्तर भारत आज थंडीची लाट कायम राहील, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ईशान्य भारतात दाट धुक्याचा थर राहील, आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेशात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि हिम वर्षाव होईल, तर मेघालय, नागालैंड, मणिपुर, मिझोराम आणि त्रिपुरा मधेही उद्यापर्यंत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
हिमाचल प्रदेशाच्या विविध भागांमध्ये थंडीची लाट कायम राहील, तर पश्चिम बंगालच्या डोंगराळ प्रदेशात आणि सिक्कीम मध्ये दाट धुक्याचा थर राहील. वायव्य भारतात पुढले दोन दिवस कमाल तापमानात १ ते ४ अंश सेल्सिअस घट होईल असा अंदाज आहे.