बांगलादेशात आरक्षणविरोधी आंदोलकांच्या झालेल्या हत्यांच्या विरोधात आणि त्यांनी मांडलेल्या नऊ मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी उद्यापासून देशभरात असहकार आंदोलन पुकारलं आहे. यात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी देशवासीयांना केलं आहे. तसंच आजही देशात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. भेदभावविरोधी विद्यार्थी चळवळीच्या दोन समन्वयकांनी विविध समाजमाध्यमांवरून काल ही घोषणा केली. जवळपास दोन आठवड्यांनंतर काल राजधानी ढाकासह विविध ठिकाणी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांच्यात झालेल्या संघर्षात दोन जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होत. दरम्यान, गेल्या महिन्यात या आंदोलनाचं वार्तांकन करताना मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांना न्याय देण्यासाठी ४८ तासांचा इशारा पत्रकारांनी दिला आहे. दरम्यान, सत्ताधारी आवामी लीगचे सरचिटणीस ओबैदुल कादर यांनी काल पत्रकार परिषद घेतली. विद्यार्थ्यांना त्रास न देण्याच्या आणि अटक न करण्याच्या सूचना सुरक्षा यंत्रणांना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
Site Admin | August 3, 2024 12:40 PM | Bangladesh
बांगलादेशात आरक्षणविरोधी आंदोलकांच्या झालेल्या हत्यांच्या विरोधात उद्यापासून देशभरात असहकार आंदोलन
