नोईडा आंतररराष्ट्रीय विमानतळामुळे दळणवळण वाढेल आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हणजे एनसीआर क्षेत्र आणि उत्तर प्रदेशातल्या लोकांचं जीवनमान सुकर होईल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपलं सरकार जनतेला उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा मिळवून देण्यासाठी अनेक पाऊलं उचलत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे.
नोईडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम सध्या सुरू आहे. विमान धावपट्टीवर उतरण्याची पहिली चाचणी काल यशस्वी झाली. दिल्लीहून आलेलं विमान दुपारी धावपट्टीवर उतरलं. पाच मिनिटांच्या विश्रांतीनंतर त्याचं लगेच उड्डाण झालं. या विमानतळाचं ८५ टक्के काम पूर्ण झालं आहे. त्याचं काम एप्रिलमध्ये पूर्ण होणार आहे. त्यांतर त्या विमानतळावरून रोज ६५ विमानांचं उड्डाण होऊ शकणार आहे. प्रत्यक्ष सेवा सुरू झाल्यानंतर हे विमानतळ आशियातलं चौथं सर्वांत मोठं विमानतळ असणार आहे.