डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

October 8, 2024 7:28 PM | Nobel Prize 2024

printer

भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार वैज्ञानिक जॉन जे. हॉपफिल्ड आणि जेफ्री ई. हिंटन यांना जाहीर

भौतिकशास्त्रातला यंदाचा नोबेल पुरस्कार जॉन जे. हॉपफिल्ड आणि जेफ्री ई. हिंटन या वैज्ञानिकांना जाहीर झाला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता विकासासाठी यांत्रिक शिक्षणात केलेल्या संशोधनाबद्दल हा पुरस्कार त्यांना मिळाल्याचं रॉयल स्वीडीश अकॅडेमी ऑफ सायन्सेसने जाहीर केलं आहे. जॉन हॉपफिल्ड यांनी प्रतिमा आणि इतर विदा प्रणाली साठवून ठेवण्याकरता संलग्न मेमरीची निर्मिती केली आहे. उपलब्ध माहितीतून वैशिष्ट्यं ओळखून काढून प्रतिमांमधून ते शोधण्याची कृत्रिम बुद्धिमत्तेची पद्धत जेफ्री हिंटन यांनी तयार केली आहे. या दोन्ही संशोधकांनी भौतिकशास्त्रातल्या पद्धती आणि संकल्पनांचा वापर या निर्मितीत केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा