यंदाचा साहित्यातला नोबेल पुरस्कार दक्षिण कोरियाच्या प्रसिद्ध लेखिका हान कांग यांना जाहीर झाला आहे. कांग यांच्या काव्यात्मक गद्यसाहित्य प्रकारातल्या लेखनासाठी त्यांना हा पुरस्कार देत असल्याचं स्विडीश पुरस्कार समितीनं जाहीर केलं आहे. मानवी जीवन, त्यातली असुरक्षितता, वेदना, आयुष्यावर होणारे आघात यांचं प्रभावी वर्णन या साहित्यप्रकारात कांग यांनी केलं आहे. त्यांची ही लेखनशैली वाचकांना अंतर्मुख करणारी आहे.