यंदाचा रसायनशास्त्रातला नोबेल पुरस्कार डेव्हिड बेकर, जॉन जंपर आणि डेमिस हसाबिस या तिघांना प्रथिनांची रचना आणि आरेखन यातल्या संशोधनासाठी जाहीर झाला आहे. अमेरिकेत सिएटलमधल्या वॉशिंग्टन विद्यापीठात कार्यरत बेकर पुरस्काराची निम्मी रक्कम यांना देण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता विकासात प्रथिनांच्या गुंतागुंतीच्या रचना उकलणारं संशोधन करणारे जंपर आणि हसाबीस यांना उर्वरित रक्कम विभागून देण्यात येणार असल्याचं रॉयल स्वीडीश अकॅडेमी ऑफ सायन्सेसने जाहीर केलं. हे दोन्ही वैज्ञानिक लंडनच्या गूगल डीपमाईंड प्रयोगशाळेत काम करतात.
Site Admin | October 9, 2024 7:29 PM | Nobel Prize 2024