जागतिक शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार यंदा जपानमधल्या निहोन हिदानक्यो या संस्थेला जाहीर झाला. हिरोशिमा आणि नागासाकीवर झालेल्या अणुबॉम्ब पीडितांसाठी ही संस्था काम करते. जग अण्वस्त्रमुक्त करण्यासाठी आणि प्रत्यक्षदर्शींच्या कहाण्यांमधून अण्वस्त्रांचा वापर पुन्हा कधीही होऊ नये, यादृष्टीनं या संस्थेनं केलेल्या प्रयत्नांचा सन्मान म्हणून यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार या संस्थेला देत असल्यानं नॉर्वेजियन नोबेल समितीनं म्हटलं आहे.
Site Admin | October 11, 2024 8:39 PM | NobelPeacePrize