विणकरांच्या कल्याणासाठी सरकार सातत्यानं काम करत असल्याने राष्ट्रीय विणकर आयोग स्थापन करण्याचा कोणताही विचार नसल्याचं वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी आज लोकसभेत पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. विणकरांसाठी आर्थिक मदतीसह लघु क्लस्टर विकास कार्यक्रम, हातमाग विपणन सहाय्य आणि हातमाग विणकर कल्याण अशा अनेक योजना सरकार राबवित असल्याचं ते म्हणाले.
Site Admin | December 3, 2024 2:49 PM | वस्त्रोद्योग मंत्री | विणकर