लातूर शहरातल्या विवेकानंद चौक परिसरात आज सकाळी भूगर्भातून आवाज झाला. त्यामुळे शहराला भूकंपाचा धक्का झाल्याची चर्चा होऊ लागली. जिल्हा प्रशासनानं यासंदर्भात नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राकडे चौकशी केली. मात्र भूकंप मापन केंद्रात भूकंपाची कसलीही नोंद झाली नसल्याचं समजलं. नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसंच अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं केलं आहे.
Site Admin | September 11, 2024 6:06 PM | Latur city